मुंबई : आज सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालीय. आज सोने ४३३ रुपयांनी तर चांदी ६६५ रुपयांनी वाढली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९३८० रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ६३९९० रुपये आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव ४९०९९ रुपये आहे. तर चांदीचा भाव ६२८५६ रुपये आहे. मागील दोन सत्रात सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. अनलॉकअंतर्गत सरकारने विवाह सोहळ्याला १०० लोकांच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सराफ व्यवसायिकांकडून सोन्याची खरेदी वाढली असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८१४० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४९१४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४८०५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२४१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४७५१० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५०६१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६५६० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०७८० रुपये आहे. त्यात बुधवरच्या तुलनेत ४८० रुपयांची वाढ झाली आहे.