मुंबई,दि.२९ : 2020 – 21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला 1 ऑक्टोबरपासून राज्यात प्रारंभ होत आहे,
अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी
दिली आहे.तर 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होईल,असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करता आपापल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर आधार कार्डची छायांकित प्रत आणि पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. केंद्र सरकारने 3 हजार 880 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा हमीभाव
जाहीर केला आहे.तर 15 सप्टेंबरपासून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उडीद खरेदीला 1 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.