ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेवर कोरोनाचे सावट ; 50 लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पाडण्याचे आदेश

सोलापूर :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेवर यंदा निर्बंध लावण्यात आलेले आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येत ही यात्रा पार पडत असते. मात्र यंदा यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पाडण्याचे आदेश प्रशासनेतर्फे देण्यात आले आहेत. तसेच नंदीध्वज मिरवणूर रद्द करण्यात आली आहे. यानुसार १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाºया यात्रेसाठी मंदिर भाविकांना बंद असणार असून जिल्हा व परराज्यातून भाविक येणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त आदेश जारी करणार आहेत.

 

शहर, जिल्हा आणि राज्याबाहेरून या यात्रेसाठी भाविक मोठ्यासंख्येने येत असतात. मात्र निर्बंध लावलेले असताना भाविक मंदिरात येऊ नये यासाठी सोलापुरातील काही भागात संचारबंदीचे आदेश पोलिसांनी जारी केले आहेत. सोलापूर शहर पोलिस आय़ुक्त अंकुश शिंदे यांनी ही आदेश दिले आहेत. 12 जानेवारी रात्री 00.01 पासून ते दिनांक 17 जानेवारी रात्री 00.00 पर्य़ंत हे आदेश लागू राहणार आहेत.

 

साोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट कॉर्नर-हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्ता-स्ट्रीट रोड-सिद्धेश्वर कन्या प्रशाला-वनश्री नर्सरी-विष्णू घाट-गणपती घाट-सरवस्ती कन्या प्रशाला-भुईकोट किल्याचा आतील परिसर-चार पुतळा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी संबंधित पोलिस ठाण्याकडून रहिवाशी पुरावा दाखवून पासेस प्राप्त करुन घ्यायचे आहेत. इतर बाहेरील व्यक्तींना या परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान, शासनाने २४ डिसेंबरला धार्मिकस्थळे सुरू करताना कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून घालून दिलेल्या नियमावलीनुसार विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हाधिकाºयांनी निर्णय घ्यावा असे कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांकडे यात्रेबाबत प्रस्ताव सादर केला.  त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पोलीस आयुक्त व अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून घातलेल्या अटींचे पालन करून परवानगी देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना ८ जानेवारी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!