सोलापूर : सोलापूर शहरात आज सोमवारी कोरोनाचे नवे २७ रुग्ण आढळून आले आहे. तर आज २५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १७ पुरुष तर १० स्त्रियांचा समावेश आहे.
आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार ४३५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे ४०८ निगेटीव्ह आहेत. तर २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजार ३८७वर गेली आहे. त्यातील नऊ हजार ३९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात ४३१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.