सोलापूर – उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. २९ डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे फरार होते. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यावरुन पाठलाग करत काळे यांना टेंभूर्णी परिसरात अटक केली.
राजेश काळे यांच्या शोधासाठी सदर बझार पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती. आज अखेर त्यांना टेंभूर्णीजवळ अटक करण्यात आली आहे. भाजपतील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे, मात्र खंडणी मागितली नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.