सोलापूर, (प्रतिनिधी):- संपूर्ण जगभरात सोलापूरचा गौरव वाढवण्याची परंपरा कायम ठेवत सोलापूरचा सुपुत्र डॉ.राहूल शाबादी यांनी जगविख्यात पदवी मिळवून अमेरिकेत सोलापूरचे नाव अजरामर केले. त्याच्या यशाबद्दल जगामध्ये सोलापूरकरांची मान पुन्हा उंचावली आहे.
सोलापूर शहरात जन्मलेले आणि सोलापूरमध्ये शिक्षण पूर्ण केलेले डॉ. राहूल शाबादी यांनी अमेरिकेतील एफएएसई म्हणजेच दि अमेरिकन सोसायटी ऑफ इकोकार्डीओग्राफी ची मानद पदवी म्हणजेच फेलोशिप मिळवले. इकोकार्डीओग्राफी मध्ये जे तज्ञ आहेत अशाच जगभरातील हाताच्या बोटावर मोजण्या इत्नया तज्ञांनाच ही पदवी मिळते तर भारतातील अवघ्या काहीजण कार्डियाक अॅनस्थेशियालॉजिस्ट आहेत त्यांना ही पदवी प्राप्त झाली असून त्यामध्ये डॉ. राहूल शाबादी यांचा समावेश झालेला आहे.
डॉ. राहूल शाबादी हे सध्या ओमान या आखाती देशात कन्सलटंट कार्डियाक अॅनेस्थिया म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण ओमान या देशातील ते दुसरे कार्डियाक अॅनेस्थिया तज्ञ आहेत हा देखील आपल्या सोलापूरचा गौरवच आहे. डॉ. राहूल शाबादी यांचे शिक्षण सोलापूरमध्ये झाले असून त्यांच्या मोतोश्री श्रीमती उर्मिला शाबादी (कळसकर बाई) या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत त्यांच्या संस्कारातून आणि कठोर परिश्रमातूनच डॉ. राहूल शाबादी यांनी हे यश संपादन केले आहे.
डॉ.राहूल शाबादी यांच्या या उतुंग यशाबद्दल नाना कळसकर आणि परिवाराकडून मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. जगातील नामवंतामध्ये देशातील अवघ्या काही जणांमध्ये सोलापूरचे नाव यशस्वीपणे नेले त्याचे सर्व श्रेय त्याची आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला शाबादी (कळसकर ) यांनाच आहे असे यावेळी व्यक्त करण्यात आले.