ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 85.9 टक्के मतदान; प्रशासनाने व्यक्त केला प्राथमिक अंदाज

 

सोलापूर, दि.१ : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी शांततेत मतदान पार पडले.यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी 62.7 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 85.9 टक्के इतके मतदान पार पडले.या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे.सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच या निवडणुकांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचाराची रणधुमाळी झाली होती.त्यामुळे महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळाली.आता यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे पदवीधर व
शिक्षक मतदार संघ :

जिल्हा : सोलापूर

पदवीधर मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: 123)
पुरुष पदवीधर मतदार: 42070
स्त्री पदवीधर मतदार: 11742
इतर (TG) पदवीधर मतदार: 1
एकूण पदवीधर मतदार: 53813

सकाळी ८ ते ५ या कालावधीत झालेले मतदान

पुरुष: 27170
स्त्री: 6229
एकूण : 33399
मतदान टक्केवारी : 62.07 टक्के

शिक्षक मतदार संघ मतदान
(एकूण मतदान केंद्रे: 74)

पुरुष शिक्षक मतदार: 10561
स्त्री शिक्षक मतदार : 3023
एकूण शिक्षक मतदार: 13584

सकाळी ८ ते ५ कालावधीत
झालेले मतदान

पुरुष: 9225
स्त्री: 2371
एकूण : 11558

मतदान टक्केवारी :
85.09 टक्के

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!