सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एम. एस्सी. भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि. 16 जानेवारी 2020 रोजी ऑनलाइन पुन: प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांनी दिली.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रवेश परीक्षा होत आहे. एम एस्सी कंडन्सड मॅटर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, नॅनो फिजिक्स या तीन विषयांच्या नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही पुनर्परीक्षा होत आहे. दि. 16 जानेवारी रोजी दुपारी 2.30 ते 4.30 यावेळेत ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून Admission and Eligibility या मथळयाखाली Online Application for M. Sc. Physics Re-Entrance Examination 2020-21 मध्ये Re-entrance Examination for M. Sc. Physics -2021 (google.com) या लिंकवर क्लिक करुन विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्यांच्या ईमेलवर 16 जानेवारी रोजी लिंक पाठवण्यात येणार आहे. 16 जानेवारी रोजी ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर 18 जानेवारी रोजी निकाल घोषित होणार आहे. 20 जानेवारी रोजी प्रवेश फेरी होणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. विपुल प्रक्षाळे (7058737878) आणि डॉ. रोहन कोरे (9890296285) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.