ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर शहरातील नुकसानीची महापौर आणि महापालिका आयुक्तांकडून पाहणी

सोलापूर,दि.१४ :  सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली सोलापूर शहरांमध्ये सखल भागांमध्ये या मुसळधार पावसामुळे घराघरात पाणी शिरले तसेच सकल भागात मोठे तळे साचल्याने या ठिकाणाची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम,मनपा आयुक्त पी. शिवशंकर, आदी मान्यवरांनी केली होती.या पाहाणी दरम्यान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पाणी साचलेल्या घरातील नागरिकांनासाठी तात्पुरता व्यवस्था करण्यात यावी याबद्दल आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा केली त्या अनुषंगाने ज्या सखल भागांमध्ये तसेच अनेक नगरामध्ये व झोपडपट्टीमध्ये अशा विविध भागांमध्ये जिथे घरांमध्ये पाणी साचले आहे आणि जे घरातले पाणी बाहेर जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एक ते आठ झोन कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या भागांमध्ये ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे त्यांना तात्पुरता निवारा व भोजनाची व्यवस्था त्या भागातील मंगल कार्यालयामध्ये सोय करण्यात आले आहे अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील पाणी निचरा होण्यास वेळ लागत आहे तसेच ज्या भागातील पाणी निचरा होत नसेल अशा भागातील नागरिकांसाठी सोय करण्याचे आदेश महापौरांनी संबंधित प्रशासनाला दिले होते. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांच्या पुढाकाराने सोलापूर शहरातील नागरिकांची तात्पुरता निवारा व भोजनाची व्यवस्था त्या-त्या भागातील मंगल कार्यालयांमध्ये अथवा शाळेमध्ये करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!