अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी जनसेवक स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांची २३ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.यानिमित्त अक्कलकोट येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.याचे उद्घाटन भाजपचे माजी
तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, जेष्ठ नेते दत्ता तानवडे,पक्षनेते महेश हिंडोळे,नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, प्रा. सुर्यकांत कडबगावकर, प्रभाकर मजगे, शिवु वाले, प्रविण शहा, प्रा. परमेश्वर अरबाळे, राजशेखर मसुती, डॉ.अश्विनी श्रीकांत अभिवंत, डॉ.दिपक पाटील, अशोक स्थावरमठ,विजयकुमार तानवडे, प्रा.राचाप्पा वागदरे, अनिलकुमार पाताळे, प्रशांत तानवडे, रेवणसिद्ध बिराजदार, प्रविण तानवडे, इब्राहिम कारंजे, गंगाधर बिराजदार आदींची उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत युवा नेते प्रसन्न तानवडे यांनी केले.यावेळी १०२ लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली.शिरवळ येथे रक्तदान शिबिर व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रतिमापूजन विजयकुमार ढोपरे व प्रदिप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.दिपप्रज्वलन अप्पु निंबर्गी, धनराज जमगे, अजित व्हदलुरे व आप्पाशा देवकर यांनी केले.याप्रसंगी वागदरी, गोगाव, सांगवी (खु), सांगवी (बु) भुरीकवठा, साफळा, बादोला (खु), बादोला (बु), खैराट, किरनळी, कुरनुर, शिरसी, कोळीबेट, किणीमोड तांडा आदी गावातील नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व सरपंच बसवराज तानवडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रशांत तानवडे,अॅड अमितकूमार कोतमिरे, उपसरपंच महमद मुल्ला, मलकप्पा निंबाळे, अनिता आरेकर, काडप्पा तानवडे, संगप्पा चानकोटे, शिवराज तानवडे, महेश पाटिल, सचिन यादव, मयुर पवार, धनु तानवडे, नागेश बरडे, विकास थोरात, प्रसन्न खोबरे, संतोष तानवडे, दिपक कवडे, मशाक मुल्ला, अथर्व तानवडे, विवेकानंद कुंभार यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ, युवा कार्यकर्ते व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.या शिबिरात ६१ जणांनी रक्तदान केले.
यावेळी कोरोना योद्धा सन्मान सोहळा शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव होते.कोरोना योध्याचा सन्मान एम. के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनूर, डॉ. अशोक राठोड , डॉ. अश्विन करजखेडे व पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या
हस्ते करण्यात आला.याप्रसंगी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, शासकीय व निमशासकीय आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कर्मचारी, वाहन चालक, गटप्रमुख,सर्व आशा भगिनी, वागदरी बिटचे पोलीस हवालदार, पत्रकार बंधु अशा एकुण ११० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ. गजानन मारकड यांनी केले.यावेळी बोलताना कल्लप्पा पुजारी व डॉ.राठोड कोरोना काळातील आलेले अनुभव सांगितले.आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन बद्ध काम केले. जनतेच्या आरोग्याची काळजी स्व:ताचा जीव धोक्यात घालून काम केले.त्यांच्या या मानवतेच्या प्रचंड मोठ्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो,असे संयोजक आनंद तानवडे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना योद्धा सन्मान सोहळा हा पहिलाच कार्यक्रम आहे. अश्या प्रकारच्या सन्मानामुळे आम्हा प्रत्येकाला काम करण्याची प्रेरणा मिळते. आम्ही सर्व जण जनतेच्या सेवेसाठी कायमस्वरूपी तत्पर राहु. चांगली व योग्य आरोग्यसेवा प्रत्येक व्यक्तीला देऊ,असे डॉ.शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड अमितकूमार रमेश कोतमिरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तानवडे प्रतिष्ठान व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.