ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पिछाडीवर ; टीआरएस आघाडीवर

तेलंगणा : देशात चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय.  हैदराबाद निवडणुकीत आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.  दरम्यान, या निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) मुसंडी मारत असल्याचं चित्र सुरुवातीला समोर आलं होतं, पण भाजप पुन्हा एकदा पिछाडीवर गेली आहे.

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं टीआरएसच्या जागांवर आघाडी मिळवली होती. हैदराबाद निवडणूक निकालाची सध्या मतमोजणी सुरू आहे, 1 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 74.67 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ 34.50 लाख (46.55 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

30 ठिकाणी मतमोजणी केंद्रे  आहेत. मतमोजणीसाठी 8,152 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद केली जात आहे. निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरली जात होती, त्यामुळे निकालाबाबत संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!