एम.एस युथ फौंडेशन व बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षकांचा सत्कार
मैंदर्गी : एम. एस. युथ फाउंडेशन आणि श्री बसवेश्वर चारीटेबल ट्रस्टचा माध्यमातून मैंदर्गी शहरात केलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेचे अध्यक्ष महेश शावरी हे सिंगापूर येथे अभियंता म्हणुन कार्यरत असताना देखील ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षकांच्या सत्कार करून विद्यार्थी म्हणून ऋण फेडायचे कार्य केले आहे व वर्षभरात विविध उपक्रम राबवले असल्याचे मत श्री शिवाचलेश्वर देवस्थानचे सचिव सिद्धाराम काळे सरांनी व्यक्त केले आहे.
मैंदर्गी ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर मंगल कार्यालयात आयोजित श्री बसवेश्वर ट्रस्ट व एम एस युथ फाउंडेशनवतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षकांचे सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
प्रारंभी ग्रामदैवत श्री. शिवाचलेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मल्लिकार्जुन मड्डे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेश दिवटे हे होते. प्रमुख पाहुण्यांचा स्वागत विध्यार्थ्यांना स्वागतगीतांनी करण्यात आले.
यावेळी राजशेखर मसुती, नीलकंठ मेंथे, सिद्धाराम पाटील, पंडित पाटील, काशिनाथ जकापुरे, शिवचलअप्पा पुजारी, दिलीप शावरी, बाबू बजारमठ, मंजूर लुकडे आदी उपस्थित होतेे.
★ यांच करण्यात आलं सत्कार
नूतन मुख्याध्यापक एस. एन. हिरेमठ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एस. आळळोळी, अजिज शेख बसवराज होळीकट्टी, एस. एस. बुरूड, मल्लिनाथ वच्छे, प्रकाश इसापुरे, हुवानंद सलगर, ग्रंथपाल गुरुलिंगआप्पा भिंगोळी आदींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रम शरणाप्पा म्हेत्रे, राज शावरी, दत्ता चव्हाण, येशु येणगुरे, शुभम जकापुरे, वसंत आरेनवरु, शंकर हुग्गी, बसवराज हिप्परगी, गुरुलिंगप्पा गोब्बूर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येणगुरे सर यांनी केले तर राज शावरी आभार मानले, शंकर हुग्गी विशेष परिश्रम घेतले.