ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात सहाव्या दिवशीही तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरूचमागण्या मान्य झाल्या शिवाय माघार नाही, संघटनेची कडक भूमिका

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१३ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. आतापर्यंत तीन वेळा प्रशासनाबरोबर बैठक झाली आहे.  तरीही मागण्याबाबत ठोस कृती न झाल्याने आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेने घेतला आहे.

तलाठी व मंडल अधिकारी यांच्या विविध मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अनेक वेळा निवेदन, मोर्चा व आंदोलन करुन ही मागण्या मान्य होताना दिसून येत नाही. आता कुठल्याही आश्वासनाला बळी न पडता आदी  मागण्या मान्य करा ,अन्यथा रजा आंदोलन बेमुदत सुरुच राहणार असल्याचे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजशेखर पांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात ७ जुलै पासून जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीने बेमुदत रजा आंदोलन सुरु आहे. यासाठी काल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे, चिटणीस श्रीकांत पाटील यांच्या समवेत सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेच्या पदिधिकाऱ्यांशी तीन वेळा बैठक आणि चर्चा झाली. या बैठकीत मिलिंद शंभरकर यांनी येत्या चार दिवसात जिल्हा तलाठी संघटनेची मागणी मान्य करण्याचे आश्वासन देऊन रजा आंदोलन मागे घेण्यास सांगितले. यावेळी राजशेखर पांडेकर यांनी आश्वासनाला बळी न पडता आदी मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा घेतला.

सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेचे अनेक मागण्या प्रलंबित असल्याने ते शासन दरबारी वारंवार निवेदन, मोर्चा, आंदोलन करुन ही मागण्या मान्य होत नसल्याने सध्या जिल्हातील तलाठी कर्मचार्‍यातून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या तलाठी संपावर असल्याने महसूल कार्यालयातील कामकाज ही ठप्प झाला आहे.या संपा मुळे ग्रामीण भागात गावकामगार तलाठीच येत नसल्याने शेतकरी ही हैराण झाला आहे. जिल्ह्यातील ५६४ तलाठी रजा आंदोलनात सहभागी झाले आहेत. तीन बैठकीत तलाठी संघटनेच्या मागणीवर ठोस निर्णय न झाल्याने तलाठी जिल्हा संघटनेनी कडक भूमिका घेतली आहे.

यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नवीन तलाठी सजे व महसूल मंडळ निर्मिती करणे, तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी म्हणून पदोन्नती देणे, तलाठी व मंडल अधिकारी सेवा जेष्ठता यादी अद्यावत ठेवणे, तलाठी व मंडल अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभाराचे वेतन देणे, नियमित वेतन करणे, अर्जित व वैद्यकीय रजा वेळेत मंजूर करणे, निवृत्त कर्मचार्‍यांना भत्ते वेळेत अदा करणे, रिक्त पदे तात्काळ भरणे, बदलीच्या मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात, अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, सेवा वर्ग केलेल्या तलाठी व कोतवालांना मूळ सजेवर पाठविण्यात यावे,कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा, कार्यालयीन खर्च मिळावा, सर्व कार्यालयात निवासस्थान बांधून द्यावे, कोरोनाने मृत झालेल्या कर्मचार्‍यांना शासकीय मदत मिळावी, प्रधान मंत्री किसान सन्मान योजना कृषी खात्याकडे वर्ग करण्यात यावी आदी जिल्हा तलाठी संघटनेच्या मागण्या संदर्भात शासन दरबारी रजा आंदोलन सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!