सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे बांधलेल्या देशातील पहिला ब्रिज कम बंधार्याचे भूमिपूजन शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ब्रिज कम बंधार्याची संकल्पना पहिल्यांदा तिर्हे येथे साकार होत आहे. या कार्यक्रमाला आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आ. देशमुख हे सहकारमंत्री असताना तिर्हे, बेगमपूर, टाकळी, वडकबाळ येथे पूल वजा बंधारा बांधण्याची मागणी केली होती. त्याला जलसंपदा विभागाकडून मंजुरीही मिळाली होती. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार आ. देशमुख यांनी केलल्या मागणीला यशही आले आहे. त्यातील तिर्हे येथील बंधार्याचे भूमिपूजन होत आहे.
या बंधार्यामुळे दक्षिण, उत्तर आणि मोहोळ तालुक्यातील अनेक गावांच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.या बांधकामाचा खर्च व पहिले तीन वर्ष देखभाल दुरूस्तीचा खर्च केंद्र शासनाचे वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत होणार आहे. आ. सुभाष देशमुख यांनी तीन वर्ष केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
★ आ. देशमुख यांनी संजय कदमांना घेतले फैलावर
भूमिपूजन समांरभाला राष्ट्रीय विकास महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्याकडून खो जात असल्याचे पाहून आ. सुभाष देशमुख यांनी प्रकल्प संचालक संजय कदम यांना चांगलेच झापले. शासकीय कार्यक्रम कसा होऊ शकत नाही? तुम्ही सर्व आमदार, खासदारांना निमंत्रण द्या, माझी हरकत नाही अथवा कुणाला विरोध नाही, पण तुमचं जे चाललंय ना ते योग्य नाही? असा शब्दात सज्जड दम दिला.