ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

 

मुंबईः परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटी-पीसीआर चाचणीऐवजी ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत, अशांनी प्रमाणपत्र दाखवले, तरी महाराष्ट्रात यायला परवानगी आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने थैमान घातले होते. मात्र, आता रुग्णसंख्या अटोक्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

कोरोना लसीचे ज्या प्रवाशांनी दोन्ही डोस घेतले असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक नसणार. पण, अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या कोविन अॅपवरुन प्राप्त केलेले प्रमाणपत्र असले बंधनकारक असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!