ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पूरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 22 : पाटण परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाटण शहर व विविध ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. संबंधित यंत्रणांनी पूरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने  गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील व संबंधित यंत्रणांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संभाव्य पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सांगितले.

यावेळी अतिवृष्टीमुळे कोयना नदीला पूर आल्याने पाण्याखाली गेलेल्या मुळगाव पुलाची पाहणी व पाटण एस.टी. स्टँड परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी  केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!