रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, ४० जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.
या ठिकाणी एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे पथकाला घटनास्थळी पोहचण्यास अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर आज सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे.
काल संध्याकाळी चारच्या रायगडमधील तळई गावात दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली गावातील सुमारे ३५ घरे गाडले गेले होते. मुसळधार पावसामुळे या दुर्घटनास्थळी मदत पोहोचवणे शक्य झाले नाही. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल ३२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अद्यापही ८० ते ९० मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
#WATCH Incessant rains damage roads in Mahad of Raigad district in Maharashtra
A total of 36 people have died in the district due to landslides pic.twitter.com/kebygVcPjt
— ANI (@ANI) July 23, 2021