ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन?

पुणे: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने पुन्हा एकदा राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरु झाली आहे. लॉकडाउनमुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होमार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. दरम्यान, ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नसल्यामुळे परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.

10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर, 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा झाली. यावेळी बोर्डाच्या सहसचिवांनी परीक्षा परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नसल्याचे सांगितले. त्यामुळे या परीक्षा ऑइलाईन होणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!