ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अँड. आनंदराव सोनकांबळे, गायकवाड यांच्या राजीनाम्यानंतर झाली निवड

अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट
पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी काँग्रेसचे अँड.आनंदराव सोनकांबळे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांनी महिनाभरापुर्वी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता.अक्कलकोटचे सभापतीपद हे काँग्रेसपक्षाकडे असुन सभापतीपद हे अनुसुचीत प्रर्वगासाठी राखीव आहे.

पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे दोन सदस्य त्या प्रवर्गाचे असुन आता सभापती सुनंदा गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने उर्वरित काळासाठी मुगळी गणाचे सदस्य सोनकांबळे यांना सभापतीपद मिळाले. सोमवारी २६ जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात अध्यासी अधिकारी तहसिलदार अंजली मरोड यांच्या उपस्थितीत निवडणुक पार पडली.

यावेळी माजी सभापती सुरेखा काटगाव, उपसभापती प्रकाश हिप्परगी, अ.खय्युम पिरजादे, सुनंदा गायकवाड , गुंडप्पा पोमाजी ,विलास गव्हाणे, सुरेखा गंदगे, अनिता ननवरे, भौरम्मा पुजारी, राजेंद्र बंदिछोडे उपस्थित होते.

सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्या वेळेत सोनकांबळे यांचा एकच अर्ज आला. सकाळी दहा वाजुन २० मिनिटांनी त्यांनी अर्ज सादर केला.यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, माजी सभापती सुनंदा गायकवाड, मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगांव आदी उपस्थित होते.

दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभेची सुरुवात झाली. कोणाचेच हरकती आक्षेप नसल्याने नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा तहसिलदार अंजली मरोड यांनी जाहीर केले. निवडीनंतर कार्यकर्तांनी फटाके फोडुन आंनद व्यक्त केला.

सभापती निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अध्यासी अधिकारी तथा तहसिलदार अंजली मरोड, सहाय्यक अध्यासी आधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी बी.डी.ऐवळे, कर्मचारी एस.बी.मठ, आर.के.जाधव, बी.आर. गुरव,जी.व्ही.हिरेमठ आदींनी निवडीचे काम पाहिले.

उपसभापती पदी प्रकाश हिप्परगीच कायम असणार आहेत. निवडीनंतर बोलताना सभापती सोनकांबळे म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या मदतीने लोकहिताची कामे करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!