दुधनीत दिव्यांग व्यक्तिंचा कोरोना लसीकरण ; लस तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळाचे वातवरण, नागरिकांमध्ये नाराजी
दुधनी दि. २७ जुलै : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरवी ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही महिन्यांपुर्वी लस घेता का लस ? अशी स्थीती होती. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता राज्य सरकारकडून लसीकण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. असे असले तरी लसीच्या तुटवड्यामुळे ठिकठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
दुधनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर २७ जुलै रोजी पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. लसीकरणासाठी येथे लोकांनी मोठी गर्दी केली होती. लसीकरणासाठी फक्त दहा व्हायल उपलब्ध झाले होते. त्यामुळे नगरपरिषदेने फक्त शंभर जणानाचं १०० टोकण वाटप केले होते. मात्र प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर शंभर पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी केली होती. इथे ना पोलीस होते, ना नगर पालीका आरोग्य विभागाचे कर्मचारी. यामुळे गोंधळ पहायला मिळाला. दुधनी शहराबरोबर ग्रामीण भागतील तरुणदेखील कोरोना लसीसाठी कोविन अॅवपवर नोंदणी करुन येथील आरोग्य केंद्रावर लसीसाठी हजेरी लावत आहेत. यामुळे गर्दीत वाढ होत आहे.
दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कमी प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. येथे होत असलेल्या गर्दीमुळे लस मिळण्याऐवजी कोरोनाची लागण होण्याचीच शक्यता अधिक असल्याची भावना अनेक नागरिकांनी बोलून दाखवली. दुधनी आरोग्य केंद्रास फक्त महिन्यात एकदा-दोनदा तेही तोकड्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहेत. किमान आठवाड्यात दोन दिवस लस उपलब्ध झाल्यास येथील लसिकरण केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मद्त होणार आहे.
★ दिव्यांगाची लसीकरण
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहिल्यांदाच दिव्यांग व्यक्तिंना लसीकरण करण्यात आले. दुधनी आरोग्य केंद्रावर तीन दिव्यांग व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी दुधनी प्रथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मंजुनाथ पाटील, एन.एस. काळे. उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर, बसवराज हौदे, पत्रकार गुरुशांत माशाळ, शशिकांत माळगे, विलास पोतदार आणि इतर नागरीक उपस्थीत होते.