ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट संघर्ष समिती तर्फे नगरपरिषदसमोर बोंबाबोंब आंदोलन, क्रांती दिनीच नागरिकांना एल्गार

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या व अर्धवट राहिलेल्या तसेच पूर्ण असूनही वापरात नसलेल्या कामांवर नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी संघर्ष समितीने हलगीनाद व बोंबाबोंब केले.

अक्कलकोट येथील किणीरोड स्मशानभुनी येथील बगीचा आरक्षण कायम स्वरूपी हटवून दफनभुमी व स्मशानभुमी असे नोंद करावे, कोरोना काळातील घरपट्टी तसेच नळपट्टी माफ करण्यात यावे, प्रियदर्शनी मंगल कार्यालय तात्काळ सुरा करावे व आजपर्यंत नगर परिषदेचे जे उत्पन्न बुडलेले आहे ते संबधित ठेकेदाराकडून वसुल करावे, अक्कलकोट शहरातील रखडलेले पाणी टाकीचे बांधकाम जसे वेताळ चौक,
माणिक पेठ, कालिका मंदिर येथील ५ ते ६ वर्षापुर्वीपासुन रखडलेले आहे ते काम त्वरील सुरु करण्यात यावे, अक्कलकोट शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावेत,बेडर गल्ली येथील ४० सिटाचे शौचालयाचे काम तात्काळ पूर्ण करावेत, लिलाव होणाऱ्या सर्व गाळ्यांपैकी अपंग व अल्पभुधारक यांच्या करिता कांही गाळे आरक्षित करण्यात यावेत, अक्कलकोट शहरातील सर्व बगीचा सुशोभीकरण करण्यात यावेत, एवन चौकातील गाळेधारकाना संदर्भात जी नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यांना पर्यायी व्यवस्था करावेत, सोमवार आठवडा बाजारासाठी येणारी परगावचे शेतकरी, भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा व्यवस्था करावेत, अक्कलकोट शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ वाढत आहे.

त्यामुळे शहरात संपुर्ण भागात जंतुनाशकाची फवारणी करण्यात यावेत,विजयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलन राहिलेल्या गाळ्यांचे फेरलिलाव करून गाळे वापरात आणावेत, बेडर गल्ली जवळील नव्याने बांधण्यात आलेल्या मोठी गटाराची काम अर्धवट करण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यात यावेत व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी तसेच गटारीवर स्लॅब घालण्यात यावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी सचिन पाटील यांना देण्यात आले.

यावेळी अमर सिरसाट, किसन जाधव,
अंकुश चौगुले, अविनाश मडिखांंबे,
केरबा होटकर, माळू होटकर, भीमाशंकर गिर्बोने, अंबादास कामनूरकर,विनोद मोरे, वैजनाथ मुकडे, निवृत्ती पारखे, प्रसाद माने, सिद्धाराम माळी, जोतिबा पारखे, ऋषिकेश लोणारी, आतिश पवार, अंबादास शिंगे, शेखर वाले, नागेश जाधव, दिनेश रुही, शुभम मडिखांबे, सुदर्शन कांबळे, अंबादास कांबळे, सुरेश सोनकांबळे, प्रभाकर सोनकांबळे, मारुती दांडवळकर, गंगाराम धोत्रे, नेताजी मंजुळकर, महेश लिंबोळे, अंबादास वाले, राहुल शिरसागर, स्वामी कांबळे, अंबादास कांबळे, दृश्यत देडे, सिद्धार्थ सोनकांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!