अक्कलकोट, दि.२३ : ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाने संघटित होण्याची गरज आहे. या विचारानेच आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला अक्कलकोट तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात सोमवारी ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत भाजपच्या केंद्रीय धोरणावर त्यांनी टीकाटिप्पणी केली.
ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कुठली एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी समाज एक संध असणे महत्त्वाचे आहे. पूर्वी हे लोक समूहाने राहत होते, म्हणून प्रश्न निर्माण होत नव्हते. आता ओबीसी समाजाची इतकी मोठी संख्या असूनही केंद्र सरकारकडून कुटनीती सुरू आहे.
हे हाणून पाडल्याशिवाय गप्प बसायचे नाही. आपल्याला संपायचे नसेल तर या मेळाव्यात सहभागी होऊन ओबीसी नेत्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, ती ही काळाची गरज आहे. त्यासाठी तालुक्यातील ओबीसी समाजातील घटकांनी नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी यात होऊन सर्वजण एकत्र असल्याचे दाखवून द्यावे आणि या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे, ओबीसी संघर्ष समितीचे नेते शरद कोळी, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रा. भोजराज पवार, संदीप राठोड, पवन गायकवाड ,शेखर बंगाळे, मल्हारी बंडगर विलास गव्हाणे, सुनिता हडलगी, रईस टिनवाला, मंगल पाटील, अब्दुल मकानदार, नीलकंठ मेंथे, नितीन ननवरे, विलास राठोड, काशिनाथ गोळळे, काशीनाथ कुंभार, शशिकांत कळसगोंडा, डॉ.उदय म्हेत्रे, धर्मराज गुंजले ,रमेश चव्हाण सरफराज शेख, शबाना शेख, विश्वनाथ हडलगी आदींसह विविध नेते मंडळी उपस्थित होते.