अक्कलकोट, दि.२६ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेला अक्कलकोट तालुक्यात विविध अंगणवाडी केंद्रामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमात अंगणवाडी मार्फ़त विविध सेवा देऊन बालकांचे वजन उंची वाढवण्यासाठी प्रयन्त केला जातो. प्रत्येक महिन्याला प्रत्येक बालकाची वजन उंची घेतली जाते तसेच त्यांना आहार वाटप करून पालकांना आहार विषयक मार्गदर्शन केले जाते इतके असूनही काही बालके कमी वजनाची राहतात, काही बालके कुपोषित होतात,अशा बालकांना शासकीय लाभाव्यतिरिक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पंचायत राज मधील सदस्य, गावातील शासकीय कर्मचारी, शिक्षक यांना सदरचे बालक दत्तक देऊन त्याचे श्रेणीवर्धन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात दत्तक बालक श्रेणीवर्धन योजना सुरू केली. त्यास अनुसरून अक्कलकोट तालुक्यातील कमी वजनाची १ हजार १०८ बालके दत्तक दिली गेली व त्यातील २५३ बालकांची आज पूर्ण सुधारणा झाली असून इतर बालके सुधारत आहेत.
सदर योजनेअंतर्गत दानशूर दत्तक पालकांनी बालकांना जी विविध प्रकारची मदत केली. त्याची आर्थिक मूल्य केल्यास ते अक्कलकोट तालुक्यात आतापर्यंत २.५ लाख इतके झाले आहे. तसेच योजनेत दानशूर पालकांनी सहभाग नोंदवावा व आपल्या भागातील अंगणवाडी मधील एखादे तरी बालक दत्तक घेऊन त्याचे श्रेणीवर्धन करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड
यांनी केले आहे.
■ अक्कलकोट तालुका लवकरच
कुपोषण मुक्तसीईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेल्या अनेक योजनेपैकी दत्तक बालक श्रेणीवर्धन ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे आणि सदर योजनेला अक्कलकोट तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत आणि अजूनही खूप हात पुढे येतील अशी माझी आशा आहे.यातून अक्कलकोट तालुका हा १०० टक्के कुपोषण मुक्त होईल. हा माझा विश्वास आहे – बालाजी अल्लडवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी