ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सगळ्यात जास्त निधी वागदरी गावाला- आनंद तानवडे

अक्कलकोट : वागदरी जिल्हा परिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाले आहेत. या पुढील काळात येत्या दोन महिन्यात घाळीदास महाराज सभामंटप बांधकामासाठी निधी मिळवुन देणार असल्याचे प्रतिपादन वागदरी जि प सदस्य आनंद तानवडे केले.

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील श्री घाळीदास महाराज मंदिर सभागृहात अडगी जत्रा निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शरणप्पा नंजुडे होते. या वेळी घाळीदास महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवलिंगप्पा मल्लाबादे, दत्तात्रय नंजुडे, लक्ष्मण सोनकावडे, शिवशरण आष्टगी, मुत्तणा दुधगी, बसवराज नडगेरी, सिद्रामप्पा आष्टगी, चंद्रकांत बटगेरी, चिंतामणी नंजुडे, सिध्दमलप्पा नंजुडे, देवागंप्पा कोणजी, विकास नडगेरी,रेवप्पा आष्टगी, अनिल नंजुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना तानवडे पुढे म्हणाले की, वागदरी जि प मतदार संघात अपेक्षा पेक्षा जास्त कामे झाले आहेत. प्रत्येक गावात विकास कामासाठी निधी दिले आहे. सर्वात जास्त निधी वागदरी गावासाठी देण्यात आले असुन, अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण झाले आहे. आता जि प चा कार्यकाल फक्त तीन महिने राहिले आहे. तरी या काळात घाळीदास महाराज मंदिर सभामंटप साठी शक्य होईल तेवढे निधी मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तानवडे यांनी सांगितले. प्रारंभी नागप्पा आष्टगी यांनी गेल्या पाच वर्षात जि प सदस्य आनंद यांनी यांनी केलेल्या कामाची आढावा सांगितले.या वेळी शरणप्पा नंजुडे म्हणाले की, जि प सदस्य आनंद तानवडे यांनी सोलापूर जिल्ह्यातच वागदरी जि प मध्ये मोठ्या प्रमाणात निधी मिळवुन दिले आहे. पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले.
चंद्रकांत बटगेरी यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले शिवशरण आष्टगी यांनी आभार मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!