ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दारु खरेदीसाठी दोन्ही डोस घेतल्याचा प्रमाणपत्र बंधनकारक

तामिळनाडू : दारू खरेदीसाठी आता लसींचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. दोन्ही लस घेतल्याचा प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मद्य खरेदी करता येणार आहे. तमिळनाडूच्या निलगिरी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारी मद्यविक्री करणार्या दुकानांमध्ये लसिकरण पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवणार्यांनाच मद्यविक्री केली जाणार आहे. या निर्णयामुळे लसिकरण मोहिमेला गती मिळणार असुन या बाबतची जनजागृती होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी इनोसेंट दिव्या यांनी सांगितले.

निलगिरी हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कोरोना निर्बंधामध्ये आता थोडं शिथीलता देण्यात आल्यानंतर निलगिरीमध्ये पर्यटकांची संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या फैलाव रोखण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेवर विषेश लक्ष देण्यात येत असल्याचे इनोसेंट दिव्या यांनी सांगितले.

कोरोना लसी संदर्भात काही नागरीकांमध्ये संभ्रम आहे. लसीबाबत नागरीकांमधील भिती दुर करण्यासाठी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोना लसिबाबत भिती असल्याने अनेकजण लस न घेता मद्य सेवन करत आहेत. त्यातील अल्कोहॉलमुळे कोरोना होत नाही, असा गैरसमजही काही लोकांमध्ये आहे. त्यामुळे ही गैरसमज दुर करुन लसीकरणाला गति देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हधिकारी दिव्या यांनी दिली.

निलगिरीमध्ये ९७ टक्के लसिकरण करण्यात आले आहे. मात्र काहीजण कोरोनाचा लस न घेता मद्यसेवन करत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. तसेच याबाबत नगरिकांमध्ये असलेल्या गैरसमजबाबतही माहिती मिळाली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या जनजागृतीसाठी हा निर्णय घेँण्यात अला आहे. त्यामुळे लसीकरण पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असलेल्या पर्यटकांना आणि स्थानीकांना मद्य खरेदी करता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!