सिंदखेड : सीना नदीला पूर आल्याने तेलगाव, सिंदखेड, राजूर ,संजवाड येथील बंधारे व पूल पाण्याखाली गेलेले आहेत. या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उजनी धरण क्षेत्रात सतंदर पाऊस होत असल्याने सीना नदीला पूर आले आहेत. सीना नदी तुडुंब वाहत आहे. रविवारी संध्याकाळी तेलगाव बंधारा पाण्याखाली गेला होता. त्या पाठोपाठ रात्री वडकबाळ सिंदखेड, राजूर, बंधारा पाण्याखाली गेला आहे. तसेच या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली आहे. गेल्या वर्षी प्रमाणे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेतकऱ्यांची मनात भीती निर्माण झाली आहे.
सीना नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे मंद्रूप तहसीलदार उज्वला सोरटे मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनी सिना नदीकडच्या वांगी, वडकबाळ, औराद, सजवांड बोळकवठा, हत्तरसंग व कुडल या गावाला भेटी देऊन पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी आव्हाळे यांनी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जावे व शेतकरी महिला व मुलांना पाण्यात न जाण्याचे आवाहन केले. नदीचे पाणी पुलावरून पाणी वाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. तसेच प्रचंड शेतकऱ्यांचे नुकसान ही होत आहे. कालपर्यंत पावसाची गरज व्यक्त करणारे शेतकरी आता शेतातील पाण्याने पिके नष्ट होण्याची चिंता व्यक्त करत आहेत.
राजुर ता. दक्षिण सोलापूर गावच्या फुलाची उंची फार कमी आहे. पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे. रस्ता ओलांडताना नागरिकांच्या जीव धोक्यात घालून ये-जा करत असतात. हा रस्ता बंकलगी, आहेरवाडी, सोलापूरला जोडणारा रस्ता आहे. याबाबत राजुर चे माजी सभापती अशोक देवकते यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दखल घेतलेले नाहीत. तरी लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी राजुर गावातील नागरिकाकडून होत आहे – अशोकराव आनंदराव देवकते ,माजी सभापती