अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात गुरुवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती.सायंकाळी चार नंतर ढग जमा होण्यास सुरूवात झाली त्यानंतर अचानकपणे पावसाला सुरूवात झाली.
हवामान खात्याने पाऊस येण्याचा येण्याचा अंदाज वर्तविला तो अंदाज खरा ठरल्याचे बोलले जात आहे.दरम्यान या पावसाने अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट शहर आणि तालुक्यात पावसाची जोरदार रिपरिप सुरू होती.
यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तसेच गटारी तुडुंब भरून वाहत होत्या.ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून अडथळा निर्माण झाला होता. सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिले तर खरीप हंगामातील पिके संपूर्ण निघाले आहेत.
आता शेतकऱ्यांना रब्बीसाठी पावसाची प्रतीक्षा होती.सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने हा पाऊस पोषक मानला जात आहे. सध्या कुरनूर धरण तरी शंभर टक्के भरून वाहत आहे.तालुक्यातील छोटे पाझर तलाव आता भरत आहेत.या पावसाचा त्याला चांगला फायदा होणार आहे.या पावसामुळे तालुक्यात पुढील वर्षभराचा पाणीप्रश्न मिटेल,अशी शक्यता
वर्तवण्यात येत आहे.