ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला पुन्हा ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ,नागरिकांना मिळणार दिलासा

अक्कलकोट, दि.२४ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान सध्याची कोव्हीड -१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम उपक्रम राबविले जाऊ नये, असे निर्देश दिले असल्याने तसेच अनेक जेष्ठ प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला पुढील ३ महिने म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत,अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!