दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज सीबीएसई १२वि बोर्ड परीक्षा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी दिली.
बोर्ड परीक्षाच्या मुद्द्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे काही राज्यांनी लॉकडाऊचा पर्याय निवडला आहे. अशा परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालक स्वाभाविकरित्या तणावात असतात. तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा भाग घेण्यास भाग पाडता कामा नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
सिबीएसईच्या बोर्डाची परीक्षा रद्द झाली असली तरी महाराष्ट्र एचएस्सी बोर्डाची निर्णय घेणे बाकी आहे. बारावीच्या परिक्षे संदर्भात एकच निर्णय जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत केवळ सीबीएसई बोर्ड बाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्य सरकारच्या एचएससी बोर्डा बाबत कोणता निर्णय घेते याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या नजर लागून राहिली आहे.