ध्यास विश्वसार्ह बातमीचा

13 डिसेंबरपर्यंत पुण्यातील शाळा बंदच राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

पुणे : पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. १३ डिसेंबरला पुण्यातली करोनाची स्थिती पाहणार त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले आहे. याआधी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे महापालिका क्षेत्रातीलही सर्व शाळा 13 डिसेंबरर्यंत बंद राहणार आहेत.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना संसर्ग आणखी वाढू नये म्हणून १३ डिसेंबरपर्यंत पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचं वातावरण पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून आधीच माहिती देण्यात आली आहे. या लाटीला परतून लावण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. आगामी संकट लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, “शाळा सुरु करण्याचा निर्णय हा ऐच्छुक असेल. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन निर्णय घ्यावा”, अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!