मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवले आहेत. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून संप आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुभवांवरून भाजप व महाविकास आघाडी सरकारमधील नेते टीकाटिपणी करीत आहे.मात्र चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
माननीय ना.अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्यपत्रास कारण की…एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून @msrtcofficial चे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा…
चित्रा किशोर वाघ* pic.twitter.com/OWRZVZuR1C
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 16, 2021
“एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीवर तोडगा काढावा” अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून केली आहे.
चित्रा वाघ यांनी या पत्रात म्हटले आहे की, आपल्याला माहित आहे की, गेली पाच दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण आंदोलनाची सरकारी जबाबदारी योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हीलनच्या भूमिकेत जात आहेत.
एसटी विलीनीकरणाचा मुद्दा काढला की बॅलन्स शीट पुढे केली जाते. सुमारे 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांची मुलं पोरकी झाली. पत्नी विधवा झाले आहेत. ही जीवित हानी कशी भरून येणार ? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्स शीटवर ठरवली जाणार का? आयुष्याच्या बॅलन्स शीटमध्ये जगणे महाग आणि मरण स्वस्त झालंय