मुंबई : कोबीची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते. कारण कोबी खाल्याने अल्सर, मोतीबिंदू, पचन, बद्धकोष्ठता या सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी साहाय्याक आहे.तसेच कोबीमध्ये सल्फोराफेन आणि अँटी-ऑक्सिडेंटस आसतात.
यामुळे कोबीचे सेवन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. तर कोबी विषयी सांगताना आहार तज्ज्ञांनी एका मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा म्हणजे, कोबी खाल्यामुळे थेट मेंदूचे नुकसान होते.
होय, एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डाएटेशन अनु सिन्हा यांनी हा खुलासा केला आहे की, कोबीच्या भाजीमध्ये असलेले टेपवर्म म्हणजेच एक अळी व्यक्तीच्या मेंदूला हानी पोहोचवू शकतो.
कोबी मधील टेपवर्म माणसाच्या मेंदूला नुकसान कसे पोहोचते?
कोबीमध्ये टेपवर्म्स म्हणजे अळ्या आढळतात. ज्या खाल्ल्या गेल्या तर मेंदूपर्यंत पोहोचतात. हे किटाणू मानवी शरीराच्या आतड्यांची त्वचा ओलांडतात आणि मुख्य प्रवाहात पोहोचतात. यानंतर शरीरात असणाऱ्या ब्लड-ब्रेन बॅरियर ला ब्रेक करून मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपल्या मेंदूला सूज येते. शिवाय डोकेदुखी आणि ब्रेन फोग सारख्या समस्या होतात.
बचाव कसा कराल?
त्यासंदर्भात दुसऱ्या काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, कोबी खाल्ल्याने टेपवर्म होत नाहीत. कारण हे किटाणू वा कृमी कोबीच्या पानाच्या आत लपलेल्या असतात. म्हणून संसर्ग टाळण्यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वी कोबी हे पूर्णपणे स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. ही भाजी गरम पाण्याने धुऊन व पाच-दहा मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्या आणि मग खा. कारण अस केल्यामुळे भाजीच्या आत लपलेल्या किटाणू सहज बाहेर येतात आणि मरतात. यामुळे अस केल्यास कोबी खाल्याने आरोग्याला फारसे नुकसान होणार नाही.