ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर आता तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा – प्रवीण दरेकर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दीड वर्षांपूर्वी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचा घोषणा केली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार ची भूमिका सुरुवातीपासून आडमुठेपणाची होती.

उशिरा का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा आवाज ऐकला आणि पहिल्यांदाच मन की बात देशाच्या भावनेशी जोडली गेली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो,” अस संजय राऊत यांनी म्हंटले.

संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यातील एसटी कर्मचारी देखील मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कर्मचारी न्याय मागत आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाप्रमाणे एसटी कामगारांचं आंदोलन होऊ नये, अस वाटतं असेल तर त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!