अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील भाविकांची गरज ओळखून आमदार प्रशांत परिचारक यांनी शुद्ध पाण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे.त्या माध्यमातून अक्कलकोट शहर वासियांना लवकरच पाच रुपयात दहा लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. अक्कलकोट शहरातील नागरिक व परगावाहून येणाऱ्या स्वामी भक्तांकरिता वटवृक्ष मंदिराच्या पश्चिम महाद्वार जवळील नवसाच्या मारुती मंदिर समोर होणार अद्ययावत फिल्टर प्लांटची उभारणी होणार आहे.
यात नागरिकांना केवळ ५ रुपयात मिळणार १० लिटर फिल्टर पाणी मिळणार आहे.आमदार प्रशांत परिचारक यांच्या आमदार निधीतून अक्कलकोट शहरात पहिल्यांदा होणार आर. ओ.प्लांटची उभारणी होत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने प्रति तास २ हजार लिटर फिल्टर पाणी निर्माण करण्याचे क्षमता असलेले उच्च दर्जाचे हे युनिट असुन नाममात्र दरात नागरिकांना फक्त ५ रुपये मशीनमध्ये टाकल्यावर १० लिटर पाणी मिळणार आहे.
सदर प्लांटचे काम जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांनी उभारणी करून ते नगरपरिषद अक्कलकोटकडे हस्तांतर करणार आहे. ते कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर नगरपरिषद हे प्लांट देखभाल दुरुस्ती सह नागरी सुविधा मिळणेकामी बचत गटकडे चालविणे करीत देणे बाबत निर्णय घेणार असल्याचे पक्षनेते महेश हिंडोळे यांनी सांगितले. यातून भाविकांसह नागरिकांना कमी दरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळू शकेल आणि विशेष म्हणजे जास्त दर आकारणी करून विक्री होत असलेल्या पाणी जारपासून मुक्ती मिळणार आहे. या निर्णयामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
युनिटवर लक्ष ठेवणार
खूप दिवसापासून माझी इच्छा होती ती आमदार परिचारक यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. हे युनिट चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी आपण लक्ष ठेवणार असून यामुळे भाविकांची चांगली सोय सोय होऊ शकेल – महेश हिंडोळे,पक्षनेता