ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला नवा आरोप, पुराव्यांसह देशाचे गृहमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याची दिली माहीती

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने एकामागोमाग एक आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक खळबळजनक ट्विट करत गंभीर आरोप केले आहे. गेले काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराचे आणि शाळेचे रेकी करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, काहीजण या गाडीत बसून मागील काही दिवसापासून माझ्या घराचे आणि शाळेचे रेकी करताहेत. जर यांना कोणी ओळखत असेल तर मला माहिती द्यावी. जे लोक या फोटोत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे, जर माझ्याविषयी माहिती हवी तर मला येऊन भेटावं. मी सगळी माहिती देईन, असं त्यांनी सांगितलं आहे.

माजी गृहमंत्री अनिक देशमुख यांच्या प्रमाणेच माझ्या विरोधातही असाच कट रचण्यात येतो आहे. राज्यातील एका मंत्र्याला अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणेकडून सुरू आहे. त्यांच्याविरोधात लवकरच पुरावे मांडणार आहेत.

या पुराव्यांसह मुंबई पोलिस आयुक्त आणि देशाचे गृहमंत्री यांना तक्रार दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या कटकारस्थानाविरोधात मी येत्या दोन दिवसांमध्ये तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणेकडून माझ्यावर पाळत ठेवत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!