मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट “ओमिक्रॉन” ने जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वच देशांनी विविध पावले उचलायला सुरुवात केले आहेत.
पार्श्वभूमीवर राज्य सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ, नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे.
बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे.
‘ओमिक्रोन’ व्हेरिएंट हा आतापर्यंतचा सर्वात घातक विषाणू असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. राज्यात याचा शिरकाव होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून आज होणाऱ्या बैठकीनंतर काही निर्बंध कडक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.