‘देवदूत’ राज्यस्तरीय पुरस्काराने बाबा मिस्त्री सन्मानित तर कोरोना योद्धे सर्व पत्रकारांचा सन्मान, पत्रकार प्रबोधिनी आणि शांभवी फाउंडेशनचा उपक्रम
अक्कलकोट दि,२८- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मीडिया महोत्सव -२१ अंतर्गत ‘देवदूत’ राज्यस्तरीय सामाजिक पुरस्काराने सोलापूरच्या ‘बाबा मिस्त्री’ यांनां सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी हे होते.
पत्रकार प्रबोधिनी आणि शांभवी फौंडेशनच्या वतीने हे पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आयोजक स्वामींनाथ हरवाळकर यांनी केली.
कोरोना काळात रुग्ण सेवेसाठी झोकून देणारे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते तसेच सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
जिल्हास्तरीय पुरस्कारा मध्ये पत्रकार शिवानंद फुलारी, मारुती बावडे, योगेश कबाडे, विरुपाक्ष कुंभार,रविकांत धनशेट्टी, स्वामीराव गायकवाड, शिवानंद गोगाव, अमोल फुलारी, अशपाक मुल्ला,दयानंद दणुरे, राजू जगताप, रवी बगले,अनिल कापसे, विजय विजापूरे यांना प्रदान करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्या युवा समाजसेवकां च्या कर्तृत्वाची दखल घेऊन नगरसेवक मुत्तु मालक खेडगी,उत्तम गायकवाड यांना ‘उत्कृष्ठ कार्यगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
धर्मा गुंजले,काशिनाथ कुंभार यांना ‘सोशल मीडिया’ जनमित्र पुरस्काराने तर फातिमा शेख आदर्श शाळेच्या पुरस्काराने अँग्लो उर्दू प्रशाला, अक्कलकोट यांना सन्मानित करण्यात आले. ‘गुडपोलिसिंग’ पुरस्कार पोलीस विपीन सुरवसे, सलीम पीरजादे, लिंगराज स्वामी, सुनिल माने यांना मिळाला आहे.
पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा आज २८ नोव्हेंबर,रविवार रोजी सकाळी अकरा वाजता खेडगी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल च्या प्रांगणात समारंभपूर्वक संपन्न झाला यावेळी बोलताना पूज्य बसवलिंग महास्वामीजीं म्हणाले,मानव सेवा हाच जगातला खरा धर्म आहे.कार्यक्रमास पंचायत समिती सभापती अँड. आनंदराव सोनकांबळे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,जिल्हा परिषद सदस्य आनंद तांनवडे,सरपंच राजा लकाबशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.खंडू खंडागळे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि. सिद्धांत हरवाळकर,रोहन हरवाळकर, संजय मानकर,रविकांत धनशेट्टी यांनी परिश्रम घेतले.