ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अध्यात्म आत्मसात केल्याने जिवनाला नवी दिशा मिळते; डॉ.हेरंबराज पाठक यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन

अक्कलकोट,दि.२८ : अध्यात्म आत्मसात केल्याने जिवनाला नवी दिशा मिळते. स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीतून डॉ. हेरंबराज पाठक  यांनी ती दिशा आध्यात्माच्या माध्यमातून समाजाला योग्य प्रकारे दिली आहे. केवळ त्यांनी नोकरी केली नाही तर अध्यात्माची गोडी सर्वांना लावली,असे गौरवोद्गार ह.भ.प सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काढले.

रविवारी,अक्कलकोट येथे समर्थ नगरी प्रतिष्ठान व डॉ. हेरंबराज पाठक गौरव समितीच्यावतीने डॉ. पाठक यांनी लिहिलेल्या अथ योगिया दुर्लभ , तसेच दैनिक संचारमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक लेखांवर आधारित ‘तू सखा आणि मी भक्त’ आणि ‘आठव आठवणींचा’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, कार्यकारी अभियंता नंदकुमार आरगकर, श्री स्वामी समर्थ सेवा परिवाराचे संदीप म्हात्रे,पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे,जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांची उपस्थिती होती.

या सोहळ्यात लहान बालकांच्या माध्यमातून ग्रंथांची दिंडी मोठया भक्तीभावात हत्तीवरुन काढण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समर्थ नगरी प्रतिष्ठानच्यावतीने सेवा निवृत्ती निमित्त डॉ .पाठक यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. जयसिध्देश्वर स्वामीजी यांनी पाठक यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा सांगत आता पाठक यांनी राज्यातील थोर संतांच्या सहवासात ‘आई’ या विषयावर एक ग्रंथ लिहावा.आम्ही सारे त्याचे प्रकाशन करु, असा अनमोल सल्ला दिला.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यानी पंचायत समितीच्या सेवेत  डॉ . हेरंबराज पाठक यांनी कोणाकडूनही बोट करून न घेता सर्वांना आपलेसे करून घेवून सर्वांना ही व्यक्ती आपली आहे, असे वाटण्यासारखे काम केले,असे सांगितलेे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठक यांनी आपल्या कार्याचा ठसा शासकिय सेवेत उमटविला आहे , ते अनेक लोकांचे मार्गदर्शक आहेत,पुढील काळात त्यांनी अध्यात्म सेवेत आपले योगदान देत साहित्य क्षेत्रातही चांगले योगदान दयावे ,असे ते म्हणाले.

शासकिय सेवा निभावत अध्यात्म, साहित्य, संगीत आदि क्षेत्रात नावीण्य मिळवून सर्वाना आपलेसे करणारे हेरंबराज पाठक यांनी टेक्नॉलॉजीच्या धगधगत्या जिवनात ग्रंथाचे लेखण करून तरूणासमोर चांगला आदर्श घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

आज वाचनावर अधिक भर दिले जात नाही आहे. वाचाल तर वाचाल याप्रमाणे तरुणानी वाचनाकडे वळावे,असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोट यांच्यावतिने जिल्हा परिषदेच्या सेवेत उत्कृष्ट
कार्य करित असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .

या सोहळ्यास अक्कलकोट पंचायत
समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्य केलेले डॉ. तानाजी लोखंडे, किरानंद बोने, भारगावराम भालेराव ,वैजिनाथ साबळे,महादेव बेळळे, गंगाराम अकेले, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ .अश्विन करजखेडे, गट शिक्षणाधिकारी
अशोक भांजे आदीसह जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, पंचायत समिती सदस्य राजकुमार बंदीछोडे, गुंडप्पा पोमाजी, माजी सभापती महिबूब मुल्ला,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी, निवेदक अभिराम सराफ ,पद्माकर कुलकर्णी
यांनीही उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्थ नगरी  प्रतिष्ठानचे सैदप्पा इंगळे, सिद्राम वाघमोडे, भीमराव धडके, प्रकाश उर्फ अप्पू उण्णद,  चंद्रप्रकाश उदगिरी, डॉ . मनोहर मोरे, सुभाष तारापुरे, राहुल होटकर ह .भ. प चंद्रकांत डांगे, विद्याधर गुरव , गणेश पाठक , ओंकार पाठक राजेश वडिशेरला, रवी जोशी आदिंनी परिश्रम घेतले.

डॉ.पाठक यांच्या गौरव समितीमध्ये श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, श्री वटवृक्षस्वामी  महाराज देवस्थानचे कै. कल्याणराव इंगळे पॉलीटेक्निक अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार भुईगांव वसई, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थान ओरस, ब्राह्मण सभा अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ सांप्रदायिक भजनी मंडळ बहुउद्देशीय सेवा संस्था कुरनूर ,अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखा अक्कलकोट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखा अक्कलकोट, शांतिब्रह्म एकनाथ महाराज देवस्थान नाशिक, श्री साई रामहरी ट्रस्ट पुणे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूर ,पद्म फाउंडेशन सोलापूर,अक्कलकोट तालुका ग्रामसेवक संघटना अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ मराठी पत्रकार असोसिएशन अक्कलकोट, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूर ,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखा सोलापूर, अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक संघ अक्कलकोट, अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समिती अक्कलकोट ,श्री जागृत मारुती देवस्थान समिती गोडगाव बु तालुका अक्कलकोट, अक्षर ब्रह्म गीताधर्म प्रतिष्ठान तळेगाव (दा)पुणे, रसिक साहित्य वाचक मंडळ डोंबिवली आदि संस्थांचा समावेश होता.

ऋणानुबंध असाच कायम राहावा

हा ऋणानुबंध असाच माझ्या सोबत कायम राहावा. या पुढील काळात स्वामी समर्थांच्या चरणी माझी सेवा सदैव घडावी. अध्यात्माची कास अक्कलकोट नगरीतून जोडण्याचे प्रयत्न सदैव करीत राहीन. उर्वरित आयुष्यात हा प्रयत्न चालू ठेवेन – डॉ.हेरंबराज पाठक, अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!