BREAKING…! उपमहापौर राजेश काळे दोन वर्षासाठी तडीपार, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली माहीती
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे निलंबित कार्यकर्ते, सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे.
सोलापूर शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले.