तामिळनाडूत लष्कराचं MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, लष्कराचे वरीष्ट अधिकारी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघाता चौघांचा जागीच मृत्यु झाली आहे तर तिन जण गंभीर जखमी आहेत, अशी प्राथमिक माहीती समोर आली आहे. सीडीएस बिपीन रावत हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. वायुसेनेकडुन घटनेची चौकशीचे आदेश देण्यात आली आहे.
Latest pictures from the crash site where Indian military helicopter crashed in Tamil Nadu. CDS General #BipinRawat and his wife were on board along with other senior defence officials. pic.twitter.com/jKDYvAEFra
— Sudhir Chaudhary (@sudhirchaudhary) December 8, 2021
तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. एकूण दहा प्रवासी होते, लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता अशी माहिती समजते. चार जण अतिगंभीर, तीन गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिपिन रावत यांच्या पत्नीसुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.