अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात आघाडी घेईल. सोलापूर जिल्ह्य़ात काँग्रेस सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घेऊन अक्कलकोट तालुक्यात आम्ही आघाडीवर राहू, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेञे यांनी केले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अक्कलकोट व कुंभारी येथे आयोजित सभासद नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी श्री स्वामी महाराज प्रतिमापूजन चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रभारी चेतन चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, युवा नेत्या शितल म्हेञे, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेञे, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, अश्पाक बळोरगी, सभापती आनंदराव सोनकांबळे, मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, बसु अळोळी, सुनिता हडलगी, मंगल पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले,नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्ता दक्ष राहून बुथ वाईज प्रमाणिक कार्यकर्त्याची निवड करावी. सध्या तालुक्यात दहा हजार कार्यकर्ताची नोंद झाली आहे, असे त्यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यात पूर्वीपासून काँग्रेसला वाव आहे. येणाऱ्या काळात देखील काँग्रेस उभारी घेईल.मी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. सभासद नोदणीचे महत्त्व चेतन जाधव यांनी सागितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूण जाधव यांनी केले. तर आभार प्रथमेश म्हेञे यांनी मानले.
तालुका पुन्हा काँग्रेसमय होईल
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस वर्चस्व होईल. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे पक्ष वाढीसाठी चांगले कार्य असून त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तालुका काँग्रेसने होईल असा विश्वास मला वाटतो – डॉ. धवलसिंह मोहिते – पाटील ,जिल्हाध्यक्ष