अक्कलकोट, दि.२३ : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्याकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून राऊंड टेबल इंडिया शाखा सोलापूर या संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर येथील विद्यार्थ्यांना तेवीशे वह्या वाटप केल्या.
अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरच्या व्यवस्थापनाने मदतीची हाक देताच राऊंड टेबल इंडिया या सामाजिक संस्थेने आपला खारीचा वाटा उचलला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर येथे मराठी, कन्नड, उर्दू या तीन शाळा एकाच प्रांगणात भरत असून तेथील पट 500 विद्यार्थ्यांचा आहे. येथे 1 ली ते 7 वी चे वर्ग भरतात. विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन अखंड चालू रहावे यासाठी राऊंड टेबल इंडियाने 2300 वह्या वाटप केल्या.
या कार्यात राऊंड टेबल इंडियाचे श्री. तरंग शहा(एरिया 15 सेक्रेटरी), श्री. रोहन शालगर (अध्यक्ष RT 150), शशांक कार्वेकर (अध्यक्ष RT 187), रोहित राठी (अध्यक्ष RT 309), अभिजीत मलाणी, पुष्कराज कोठारी, सौरभ कोठारी, निशित गाला, धनंजय गोडबोले, आशितोष राठी, आनंद मानवनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या वह्या वाटपच्या प्रसंगी वेळी गावच्या सरपंच सौ. सुरेखा गुंडरगी, श्री. सातलिंगप्पा गुंडरगी साहेब, युवा नेते श्री. प्रविण शटगार, मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत बिराजदार, कन्नड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन लोहार, उपाध्यक्ष श्री. सातप्पा पाटील, उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अब्दुलनजीर बिराजदार, उपाध्यक्ष बेगम कासिम बोरगाव, मराठी शाळेचे सदस्य श्री.अशोक बिराजदार, ग्राम विकास अधिकारी श्री.प्रदीप तोरसकर, तंटा मुक्ती अध्यक्ष श्री. अशोक पाटील, पोलीस पाटील श्री.श्रीशैल बिराजदार, कन्नड शाळेचे सदस्य श्री. कालीबत्ते आदी. मान्यवर उपस्थित होते.
सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी सलगर मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री. काशीराया पटणे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. मेहमूद नवाज जागीरदार तसेच तिन्ही शाळेच्या शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले.