ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यातील शाळा “या” तारखेपासुन सुरु होणार, मुलांना शाळेत पाठवायचे का नाही याबाबतचा निर्णय पालकांचा – पालकमंत्री अजित पवार

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रवारीपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तरी, पालकांनी मुलांना शाळेत पाठवयचा का नाही, तो निर्णय घ्यायची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यात आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोनासंदर्भातली आढावा बैठक झाली. यावेळी पुण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुण्यात रुग्णसंख्येत घट होत असल्याचं अजित पवार म्हणाले. “पुण्यात नवीन रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. काही राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे. पण महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवस रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती अजून कमी व्हावी अशी अपेक्षा आहे”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ” पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजस १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिले ते आठवीते वर्ग हे चार तासाचं सुरु राहतील. तर, न वी नंतरच्या वर्ग पुर्णवेळ होणार आहेत. शाळेत पाठवायचे का नाही याबाबतचा निर्णय पालकांना घ्यायचा आहे. तसेच, मुलांचे लसीकरण अधिकाधिक होण्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.”

मास्क संदर्भातील वृत्त खोटं

दरम्यान, राज्यात मास्कसंदर्भातले निर्बंध हटवण्याची कोणतीही चर्चा मंत्रीमंडळ बैठकीत झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “मंत्रीमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही अशी चर्चा झाल्याचं वृत्त आलं. पण हे धादांत खोटं आहे. तशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मास्क वापरलाच पाहिजे. करोना काळात तसा निर्णय बाहेरच्या देशांनी घेतला असेल. तो त्यांना लखलाभ. पण आपल्या राज्यात तशा प्रकारची चर्चाही नाही. तसा कुठला निर्णयही झालेला नाही. कृपा करून लोकांमध्ये कुणीही गैरसमज पसरवू नये”, असं पालकमंत्री अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!