सोलापूर ४ फेब्रुवारी २०२२: बालपणात होणाऱ्या कर्करोगावर योग्य उपचार करीत रुग्णांमधील केअर गॅप बंद करणे आणि दुर्गम भागातील बालरोग कर्करोग रुग्णांना संपूर्ण काळजी देण्यासाठी एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलने जागतिक कर्करोग दिनानिमित्त सुपर स्पेशालिटी हेमॅटो ऑन्कोलॉजी (सर्व प्रकारच्या रक्त कर्करोगाशी संबंधित) आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट ओपीडी सुरू केली आहे.या ओपीडीमुळे बालपणातील कर्करोगाच्या रुग्णांना कार्यक्षम बाह्यरुग्ण सेवा मिळू शकेल. तसेच, हेमेटोलॉजिकल डिसऑर्डर आणि कर्करोग असलेल्या रुग्णांना सर्वसमावेशक काळजी आणि उपचार मिळतील. एसआरसीसी मुलांचे रुग्णालय हे नारायणा हेल्थ मुंबई द्वारे व्यवस्थापित केले जाते.या सोहळ्याचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पार पडले यावेळेस वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ . संजीव ठाकूर, तसेच एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉ. फहीम गोळीवाले, डॉ. धीरज सिन्हा, डॉ. अल्मा गोळीवाले, डॉ. विपुल दोषी, डॉ. फडे, डॉ. बी. एस . बिराजदार, डॉ. मनीषा चव्हाण उपस्थित होते.
१९ मार्च २०१८ रोजी सुरू झालेल्या हॉस्पिटलचे डॉ. अल्मा गोळीवाले हे या हॉस्पिटलचे संचालक आहेत. सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील हे एकमेव कॅन्सर सेंटर आहे ज्यात एकाच छताखाली सर्व सुविधा आहेत. सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, हेमॅटो-ऑन्कोलॉजी आणि संबंधित शाखा असलेले हे ५० खाटांचे हॉस्पिटल आहे. यामध्ये रेडिएशन थेरपीसाठी हाय एंड लिनियर एक्सीलरेटर मशीन आहे. पीईटी स्कॅन आणि गामा कॅमेरा ही संस्था अत्यंत परवडणाऱ्या किमतीत सर्वसमावेशक कर्करोग उपचार उपलब्ध करून देते.
या ओपीडीबाबत सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. फहीम गोळीवाले म्हणाले की लहान मुलांमधील कर्करोगावर उपचार सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या देखरेखीखालीच शक्य आहेत. बालरोग रुग्णांना हा आजार पुन्हा होणार नाही यासाठी दीर्घकालीन वैद्यकीय सल्ला आणि काळजी घेणे आवश्यक आहे. या ओपीडीमुळे सोलापूर आणि आसपासच्या भागातील बालरुग्णांना योग्य काळजी आणि सल्ला सहज उपलब्ध होणार आहे.
क्लिनिकल कॉलेजियम फॉर ऑन्कोलॉजी सर्व्हिसेसच्या अध्यक्षा डॉ. पूर्णा कुरकुरे म्हणाल्या की बालपणी कर्करोग असलेले ७० ते ८० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात. सर्व कर्करोगांपैकी सुमारे ५ टक्के बालपण कर्करोग आहेत. लहान मुलांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजीमधील निदान सेवांसह बालरोगतज्ञ, बाल कर्करोग विशेषज्ञ, बालरोग ऑन्कोसर्जन, रेडिएशन, ऑन्कोलॉजिस्ट यासारख्या विशेष टीमची आवश्यकता असते. आमच्या ओपीडीमध्ये रुग्णांना नारायणा हेल्थ (एनएच) एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून योग्य सल्ला देत चांगली काळजी घेतली जाईल.
बालकांतील कर्करोगासाठी ‘क्लोज द केअर गॅप’चे उद्दिष्ट
◆ बालपणातील कर्करोगाच्या रुग्णांचे सोलापूर येथे निदान झालेल्या एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई येथे सर्वसमावेशक सेवा मिळणार
◆ सोलापूर येथे उपचार सुरू असलेल्या रुग्णांना देखील समान सेवा पुरवीत योग्य काळजी घेतली जाणार