ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठविणार, आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण

अक्कलकोट,दि.२४ : समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करतात म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवू, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्री ष. ब्र. डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी हे होते.

यावेळी गटशिक्षणाधिकारी क्युदसिया शेख राज्य सल्लागार बाळासाहेब काळे, जिल्हाअध्यक्ष वीरभद्र यादवाड ,उतमराव जमदाडे, जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हतूरे , पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राम बिराजदार, चेअरमन जयश्री मुनोळी, शिक्षण विस्तार अधिकारी वाले, केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे , व्हा. चेअरमन परमेश्वर किणगे  तालुका अध्यक्ष अभिजीत सुर्डीकर विजय तडकलकर, जिल्हा संपर्क प्रमुख सिध्दाराम डोळळे आदी जण उपस्थित होते.

यावेळी राज्य सल्लागार काळे यांनी शिक्षकांना अशैक्षणीक कामे देवू नका शिक्षकांना शिकवू दया अशी भूमीका मांडली. गटशिक्षणाधिकारी शेख यांनी शिक्षकांचे प्रश्र सोडवू अशी ग्वाही दिली. चेअरमन जयश्री मुनोळी यांनी पतसंस्था विकासाचा आढावा सादर केला. यावेळी पंचवीस शिक्षकांना आदर्श पुरस्काराने व पाच शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले.

आदर्श शिक्षक : अरुण पोपसभट (शाळा हंजगी )रमेश गोदे (शिरवळवाडी ) लक्ष्मण वाघमोडे (गळोरगी) सूरज जाधव ( तळवाड ) गुडेराव बादोले (गुरववाडी ) श्रीशैल मलगण (दुधनी ) मलकणा हिप्परगी ( हिप्प२गी वस्ती ) काशीनाथ पोतदार ( न . प अक्कलकोट ) भीमाशंकर बिराजदार (भोसगे ) अशोक सदरखेड (कोर्सेगांव ) सचिन धुमाळ (अरळी) गणपती पवार (गौडगiव कन्नड ) काशीनाथ भांड ( सुलेरजवळगे ) बसवराज गवंडी (गवंडी वस्ती ) प्रकाश पाटील (कर्जाळ ) अण्णाराव व्हरकेरी (तोळणूर ) रंजना गव्हाणे (न . प . अक्कलकोट ) उषा राठोड (गौडगांव बु ॥ मराठी ) गुरुदेवी बालकुंदी ( भवानीनगर बादोले ) निर्मला मलगणकर (नागणसूर ) यास्मीन सौदागर (तडवळ ) सुरेखा मिसे ( इब्राहिमपूर ) म. ईसाक बागवान ( आबावाडी ) सविता घोळसगांव (निमगांव ) ईरबसप्पा परतबादी आदर्श शाळा : जि.प. प्रा मराठी शाळा बोरगांव (दे .) जि.प. प्रा कन्नड शाळा सिन्नूर’ जि.प. उर्दू शाळा ब्रऱ्हाणपूर जि. प. मराठी शाळा मंगरूळ जि. प. मराठी शाळा मिरजगी यांना गौरविण्यात आले.

यावेळी सोसायटीचे संचालक विजय तडकलकर, रेवणसिद्ध हतूरे, सुरेश शटगार, धर्मराज बिराजदार, सिद्धाराम डोळळे, गुरुनाथ नरोणे, शिवानंद अरळीगीड, योगेश बारस्कर, सरचिटणीस मंजूनाथ भतगुणकी जिलानी मुजावर, बागवान आदीसह शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलीक कलखांबकर यांनी केले आभार विजय तडकलकर यांनी मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!