मुंबई : सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्री मंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या बरोबरच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक देत शिंदे सरकारनं आज काही नव्या योजनांची घोषणा केली आहे. राज्यात २० हजार पोलिसांची भरती करणार असल्याचा निर्णय फडणवीसांच्या गृहविभागानं घेतला आहे. तर चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालील प्रमाणे
१. गृहविभागातील २० हजार पदांची भरती करण्याचा मोठा निर्णय.
२. ओबीसी प्रवर्गातल्या मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी राज्यातील विविध शहरांमध्ये ७२ हॉस्टेल्स उभारणार.
३. मराठवाडा आणि विदर्भातील विकास महामंडळांचं पुनर्गठन केलं जाणार.
४. यापुढे राज्यात फॉर्टिफाईड तांदळाचं दोन टप्प्यात वितरण केलं जाईल.
५. वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार.
६. वणवा, प्राणी हल्ला, तस्कर किंवा शिकारींच्या हल्ल्यात ज्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा अथवा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ देण्यात येणार.
७. उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थांच्या शिष्यवृ्त्तीची रक्कम ५० हजारांपर्यंत वाढवली.
८. ओबीसी, विभक्त जाती, भटक्या जमाती आणि विभक्त मागास प्रवर्गातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार.
९. मराठवाडा आणि विदर्भातील विकास महामंडळांचं पुनर्गठन केलं जाणार.
१०. यापुढे राज्यात फॉर्टिफाईड तांदळाचं दोन टप्प्यात वितरण केलं जाईल.
११. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम (२०२१) मागे घेण्यात आला.
१२. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं नामकरण बॅरिस्टर नाथ पै. विमानतळ असं करण्यात येणार.