तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२ : स्वत:साठी जगणाऱ्या माणसांपेक्षा इतरांसाठी जगणाऱ्या माणसांना समाजात मोलाचे स्थान असते. अशी माणसे दुर्मिळ असतात. दुधनीच्या जनतेसोबतच महाराष्ट्र,कर्नाटकातील जनतेसाठी स्व. सातलींगप्पा म्हेत्रे यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे संपुर्ण आयुष्य हे जनसेवेसाठी समर्पित झाल्याचे प्रतिपादन दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले. दुधनीचे माजी नगराध्यक्ष सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित जनावरांसाठी लंपी व ग्रामस्थांसाठी कोरोना लसीकरण शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सभापती प्रथमेश म्हेत्रे,तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, महिला अध्यक्ष शितल म्हेत्रे, सुभाष परमशेट्टी, चंद्रकांत येगदी, काशिनाथ गोळ्ळे, बसवणप्पा धल्लु, शांभवी फाऊंडेशनचे अध्यक्ष वैशाली म्हेत्रे, डॉ.उदय म्हेत्रे, संगम म्हेत्रे, बालाजी म्हेत्रे, बसवराज हौदे, शंकर भांजी, चॉंद नाकेदार, गुलाब खैराट, राजु म्हेत्रे, गुरुशांत उप्पीन, सचिव एस.एस.स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या शेतकरी संदर्भातील योगदान व विचारांची शैली आदर्श असल्याचे नमूद केले. यास अनुसरूनच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लसीकरण शिबीर आयोजित केल्याचे सांगितले. दरम्यान आयोजित लसीकरण मोहिमेसाठी दिवसभर दुधनीत पशुपालक, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी संतोष जोगदे, मल्लिनाथ कोटणुर, शिवप्पा सावळसुर, शांतेश दोडमनी, शिवराज गुळगोंडा, गुरुशांतप्पा परमशेट्टी, सोमण्णा ठक्का, पशुवैद्यकीय अधिकारी तोलाराम राठोड, डॉ.मंजुनाथ पाटील,रामा गद्दी,
गुरु हबशी,शरणगौड पाटील, अशोक पादी, सिध्दाराम येगदी, शशीकांत सावळसुर,चपळगावचे सिध्दु पाटील यांच्यासह विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लसीकरण मोहिमेत जनावरांच्या लंपी लसीकरणात
५९६ जनावरांना तर कोरोनाच्या बुस्टर डोससाठी ४०६ नागरिकांनी लाभ घेतला.