नवी दिल्ली: जर तुम्ही जनधन बँक खातेही उघडले असेल तर तुमचे खाते आधार कार्डशी लिंक करा. अन्यथा तुम्हाला 2.30 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. प्रत्यक्षात सरकारने बँकांना सर्व खाती ग्राहकांच्या आधारशी 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करण्यास सांगितले आहे. 31 मार्चपर्यंत प्रत्येक खातं पॅन कार्ड आणि आधारने जोडलेले असणं आवश्यक आहे.
सरकारकडून या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे बँक खाते झिरो बॅलन्स (शून्य शिल्लक) बचत खाते आहे. या व्यतिरिक्त यामध्ये ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह अनेक सुविधा दिली जाते.
या खात्यातील ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात येते. ज्यामध्ये अपघाताचा 2 लाख रुपयांचा विमा दिला जातो. मात्र, तुमचे हे खाते आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. म्हणजेच, तुम्हाला थेट एक लाख रुपयांचे नुकसान होईल. याशिवाय, या खात्यावर 30000 रुपयांचा अपघाती मृत्यू विमा संरक्षण दिले जाते. हे विमा संरक्षण आधार कार्ज बँक खात्याशी लिंक झाल्यानंतरच उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही त्वरीत आपले खाते आधार कार्डशी लिंक करा.
प्रधानमंत्री जन धन योजने (PMJDY) चा 41 कोटींहून अधिक लोकांना लाभ झालाय. या योजनेंतर्गत जन धन खात्यांची एकूण संख्या वाढून 41.75 कोटी झालीय. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजना त्याच वर्षाच्या 28 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली होती.
2.30 लाखांचा विमा मिळवा
जन धन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे कार्ड दिले जाते.
या डेबिट कार्डवर एक लाख रुपयांचा अपघात विमा मोफत मिळतो.
खुल्या जनधन खात्यांवरील अपघात विमा 28.8.2018 नंतर 2 लाख रुपये करण्यात आलाय.
या व्यतिरिक्त या कार्डवर 30,000 रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण कवच उपलब्ध आहे.
ज्यांनी 15.8.2014 ते 31.1.2015 दरम्यान खाते उघडेल असेल त्या जन धन खातेधारकांना हा विम्याचा लाभ मिळेल
असे करा जन धन खात्यास आधार लिंक
तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी आधार ऑनलाईन जोडायचा असेल तर त्या बँकेसाठी तुम्हाला सक्रिय असणे आवश्यक आहे.
जर तुमचं नेट बँकिंग सुरू असल्यास लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर लिंक करण्याचा पर्याय मिळेल.
जर तुम्ही नेट बँकिंग वापरत नसाल तर तुम्ही बँकेत जाऊन खात्यास आधारशी लिंक करू शकता.
जिथे तुम्हाला आधार कार्ड, तुमची पासबुकची छायाचित्र प्रत घ्यावी लागेल.
बऱ्याच बँका आता मेसेजच्या माध्यमातूनही खात्यास आधारशी जोडत आहेत.