सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांच्या फंडातून यांच्या आमदार फंडातून सन 2022-23 मधील 25/15 योजनेतून दक्षिण तालुक्यातील विविध गावमधील विकास कामांना 5 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली.
आ. सुभाष देशमुख यांनी शासनाकडे 25/15 योजनेत दक्षिण तालुक्यातील 45 गावातील विविध विकास कामांना निधी मिळण्याची मागणी शासनाकडे केली होती, शासनाने ती मान्य केली केली आहे. राज्य शासनाने या 45 गावांसाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
दक्षिण तालुक्यातील पाकणी, नंदूर, सावतखेड, सिंदखेड, वांगी, वडापूर, भंडारकवठे बरूर, कणबस, वडकबाळ, मद्रे, अंत्रोळी, चिंचपूर, फताटेवाडी, येळेगाव, नांदणी, नवीन बोळकवठा, बेलाटी, माळकवठे, हत्तरसंग, सोदपूर, गावडेवाडी, टाकळी, राजूर, घोडातांडा, कंदलगाव, आहेरवाडी, शिरवळ, अकोले मंद्रुप, संजवाड, हत्तूर या गावांना प्रत्येकी 10 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तर कुसूर खानापूरला 15 लाख, औरद, लवंगीला 14 लाख, होटगीला 16 लाख, डोणगाव, मनगोळी 11 लाख, निंबर्गीला 12 लाख, बसवनगरला 14 लाख, मंद्रुपला 15 लाखांचा तर होनमुर्गी गावाला 12 लाखांचा निधी मंजूर झाल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.