नेपाळ : कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-यूएमएलचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांना शीतल निवास येथे पंतप्रधानपदाची शपथ दिली.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी बहुमत गमावले होते. त्यानंतर विरोधी पक्षांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी संसदेत बहुमत सिद्ध न करता आल्याने ओली यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली.
ओली यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलं असल्याने त्यांना आता पुन्हा तीस दिवसांत विश्वासदर्शक ठराव मांडून तो संमत करून दाखवावा लागणार आहे.